Monika Lonkar –Kumbhar
मनुके खायला सगळ्यांनाच आवडतात.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण चवीने मनुके खातात. मनुके आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.
मनुक्यामध्ये फायबर्स, व्हिटॅमिन्स आणि खनिजे इत्यादी पोषकघटकांचे भरपूर प्रमाण आढळते.
मनुक्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळते. जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
मनुक्यामध्ये पोटॅशिअम, फायबर्स आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे भरपूर प्रमाण आढळते. हे पोषकघटक हृदयाच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात.
मनुक्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म आढळतात, जे दात आणि हिरड्या निरोगी राखण्यास मदत करतात.
मनुक्यामध्ये आढळून येणारे व्हिटॅमिन सी आणि इतर अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात. यामुळे कर्करोगाचा धोकाही कमी होतो.