भगरमध्ये लपलाय पौष्टिक घटकांचा खजिना..!

Monika Lonkar –Kumbhar

आषाढी एकादशी

आज सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे.

उपवास

आज अनेक जण उपवास करतात. उपवासानिमित्त वरईपासून (भगर) विविध खाद्यपदार्थ बनवले जातात. वरईचे सेवन केल्याने आरोग्याला काय फायदे होतात? जाणून घेऊयात.

कॉलेस्ट्रॉल

भगरीचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होऊन हृदयविकार अथवा हृदयासंबंधित आजाराचा धोका कमी होतो.

हाडे मजबूत होतात

कॅल्शिअम मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. हाडे दुखण्यापासून आराम मिळतो.

पचनाच्या समस्या

भगर खाल्ल्याने पचनाच्या समस्या कमी होतात. यामध्ये असलेले फायबर बद्धकोष्ठता, अपचन, गॅस दूर होण्यास मदत करते. 

मधुमेहींसाठी लाभदायी

वरईमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आढळतो. ज्यामुळे, रक्तातील साखर वाढू देत नाही.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

वरईमध्ये कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे, चयापचय लवकर होते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

देशमुख वहिनींचा दाक्षिणात्य लूक पाहिलात का?

Genelia Deshmukh | esakal
येथे क्लिक करा.