सकाळ डिजिटल टीम
तुम्ही कधी मीठ मिसळलेला चहा प्यायला आहे का? चला जाणून घेऊयात मीठ घालून चहा पिण्याचे फायदे...
काश्मीर, बंगाल आणि ओडिशा सारख्या देशातील अनेक राज्यांमध्ये मीठ असलेला चहा घेतला जातो. काही रिपोर्ट्सनुसार, हा चहा चीनमध्येही पिला जातो.
मीठ घालून चहा प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. सकाळी हा चहा प्यायल्यास ताजेतवाने होण्यास मदत होते.
मीठ घालून चहा प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते.
मीठ घालून चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते. हा चहा तुम्हाला आजारांपासून वाचवण्यास मदत करतो.
मीठ शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवू शकते, त्यामुळे मीठ मिसळलेला चहा पिणे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरेल आणि तुमच्या शरीरातील पाण्याची कमतरता दूर करेल.
चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून ते प्यायल्याने तुम्ही त्वचेची अॅलर्जी आणि इन्फेक्शन टाळू शकता. या चहाचे सेवन केल्याने चेहऱ्यावरील डाग दूर होतात.
मिठामध्ये सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते. हे सर्व पोषक तत्व निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत.
मीठ घालून चहा प्यायल्याने घशातील खवखव, घशात वाढणारे बॅक्टेरिया दूर होतात आणि घशाचे आरोग्य सुधारते.
मिठाच्या चहासाठी कोणतीही विशेष कृती नाही. तुम्ही रोजच्या घरी बनवलेल्या चहामध्ये चिमूटभर मीठ टाकून पिऊ शकता. तुम्ही ते ब्लॅक टी किंवा लेमन टीमध्ये मिसळून पिऊ शकता.