Monika Lonkar –Kumbhar
शरीरासाठी सोयाबीन खूप महत्वाचे आहे. सोयाबीन मधुमेह, वजन कमी करणे आणि कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर ठरते.
सोयाबीनमध्ये प्रोटीनबरोबरच व्हिटॅमिन्स आणि इतर खनिजतत्वे मोठ्या प्रमाणात मिळतात.
शरीराला निरोगी ठेवण्यासाठी प्रथिने हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सोयाबीनचा खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात प्रथिनं मिळतात. सोयाबीन खाल्ल्यामुळे इतरही फायदे होतात.
उच्च रक्तदाबाशी संबंधित काही आरोग्य समस्या असतील तर अशावेळी सोयाबीन खाणे चांगले असते. सोयाबीन रोज खाल्ल्याने उच्च रक्तदाब आटोक्यात ठेवता येतो.
सोयाबीन रोज खाल्ल्याने शरीर मजबूत होते. तसेच हृदयरोगाचा धोका कमी होतो.
सोयाबिन मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
सोयाबीन महिलांसाठीही खूप चांगले आहे. आहारात सोयाबीनचा समावेश केल्याने ऑस्टिओपोरोसिससारखा हाडे कमकुवत होण्याचा धोका टाळता येतो. त्यामुळे, महिलांनी आहारात सोयाबीनचा जरूर समावेश करावा.