उन्हाळ्यात नाचणीचे सेवन करणे आरोग्यासाठी लाभदायी, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

नाचणी

नाचणी हे कडधान्य आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

खाद्यपदार्थ

नाचणीमध्ये पोषकतत्वांचे विपुल प्रमाण आढळून येते. नाचणीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

पोषकतत्वे

नाचणीमध्ये फायबर, कॅल्शिअम, कर्बोदके आणि जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात आढळतात. उन्हाळ्यात नाचणीचे सेवन केल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

पचनक्षमता सुधारते

नाश्त्यामध्ये मोड आलेल्या नाचणीचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत राहते. शिवाय, पोटाच्या समस्यांपासून ही आराम मिळतो.

मधुमेहींसाठी लाभदायी

नाचणीमध्ये हाय पॉलिफेनॉल आणि डायटरी फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी लाभदायी

नाचणीचे सेवन केल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. 

रक्ताची कमतरता दूर होते

उन्हाळ्यात नाचणीचे सेवन केल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. तसेच, रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढण्यास मदत होते. 

फणस खाल्ल्यानंतर 'या' गोष्टींचे सेवन करणे टाळा

Jackfruit Worst Combination | esakal