सकाळ डिजिटल टीम
स्ट्रॉबेरी फ्रुट हे एक आंबट गोड चविष्ट आणि आरोग्यदायी फळ आहे, ज्यात अनेक पोषणतत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. स्ट्रॉबेरी नियमित सेवनाने आपल्या आरोग्याला विविध फायदे मिळू शकतात. चला तर पाहूया स्ट्रॉबेरीचे काही आरोग्य फायदे
स्ट्रॉबेरी हे पोषणतत्त्वांनी भरलेले फळ आहे, ज्यात अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C आहेत, जे की प्रतिकारशक्ती वाढवण्यास आणि आरोग्यदायी त्वचा सुधारण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, विशेषतः व्हिटॅमिन C. हे अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानीकारक फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये कमी कॅलोरीज आणि जास्त पाणी असते, त्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी उत्तम फळ आहे. यामुळे शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते आणि भुकेची भावना नियंत्रित राहते.
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन C त्वचेला चमकदार बनवते आणि मुरुमांची समस्या कमी करते. हे कोलेजन उत्पादनाला उत्तेजन देणाया मदत करतात. ज्यामुळे त्वचेला लवचिकता मिळते.
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले पोटॅशियम, फोलिक आम्ल आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयाच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास मदत करतो. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवते. व हृदयविकारांचा धोका कमी करतो.
स्ट्रॉबेरीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आणि अँटीऑक्सिडंट्स कॅन्सर सेल्सच्या वाढीला थांबवू शकतात. यामुळे शरीरात कॅन्सरच्या जोखमीचे प्रमाण कमी होऊ शकते.