सकाळ डिजिटल टीम
एल्युमीनियमच्या फॉइलमध्ये गुंडाळण्याचा ट्रेंड हल्ली वाढला आहे.
मुलेही गरम रोटी, पराठा, सँडवीच फॉडलमध्ये गुडाळून नेतात. कापलेली फळे, भाज्या, तसेच सलाड फ्रेश ठेवण्यासाठी फॉइलचा वापर सर्रास केला जातो.
परंतु या फॉडलमध्ये गुंडाळलेले खाद्यपदार्थ आरोग्याला खूप घातक ठरू शकतात.
टिकून राहावे, यासाठी काहीजण रात्री उरलेले अन्न एल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवतात. असे अन्न आरोग्यासाठी घातक असते.
दोन तासांपेक्षा अधिक वेळ गरम पदार्थ फॉइलमध्ये. ठेवू नये. यामुळे हळूहळू एल्युमिनियमचे कण अन्नात मिसळू लागतात.
अनेक तास फॉइलमध्ये ठेवलेले पदार्थ खाल्ल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अनेक आजार होऊ शकतात.
आम्लयुक्त गरम पदार्थ फॉइलमध्ये गुंडाळल्यास त्यातील अंश रासायनिक प्रक्रिया होऊन • अन्नात मिसळू शकतात.
खूप गरम अन्न एल्युमिनियम फॉइलमध्ये ठेवणेही घातक असते. यामुळे फॉइलमधील रसायने अन्नात मिसळल्याने आजार होण्याची भीती असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.