Aishwarya Musale
चणे, शेंंगदाणे खायला तसे सगळ्यांनाच आवडतात. पण, भाजलेले चणे शरीरासाठी रामबाण औषध मानले जातात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, रोज भाजलेले चणे खाल्ल्याने आपलं वजन झपाट्याने कमी होतेच पण हृदयाचे आरोग्यही सुधारते.
प्रथिने, फायबर, मॅंगनीज, फोलेट, फॉस्फरस, तांबे, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखी अनेक आवश्यक पोषक तत्त्वे भाजलेल्या चण्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात.
जर तुम्ही बद्धकोष्ठतेच्या समस्येने त्रस्त असाल तर भाजलेले चणे खा. भाजलेले चणे सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. यामुळे पचनक्रियाही चांगली राहते.
भाजलेले चणे हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जातात. याच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. याचे सेवन केल्याने शरीराला अनेक समस्यांपासून आराम मिळतो
चण्यामध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते आणि प्रथिने आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळतात. भाजलेल्या चण्यामध्ये तांबे, मॅंगनीज आणि मॅग्नेशियम आढळतात.
ज्यामुळे सूज कमी होते आणि रक्तवाहिन्यांना आराम मिळतो. मॅंगनीज ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्याचे काम करते. भाजलेले चणे देखील फॉस्फरसचे स्त्रोत आहे, जे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.
जर एखाद्याला मधुमेह असेल तर त्याच्यासाठी भाजलेले चणे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, भाजलेल्या चण्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते फायदेशीर मानले जाते.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर आजपासूनच आहारात भाजलेल्या चण्याचा समावेश करा. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यामुळे वारंवार भूक लागत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.