केवळ बटाटेच नाही तर त्याच्या सालापासूनही तुम्हाला मिळू शकतात फायदे...

Aishwarya Musale

बटाटा

बटाट्याला भाज्यांचा राजा म्हटले जाते. बटाटा ही अशी भाजी आहे की जिचा वापर जवळपास प्रत्येक घरात दररोज केला जातो. 

बर्‍याच लोकांना बटाटे इतके आवडतात की त्यांना प्रत्येक जेवणादरम्यान ते खावेसे वाटते. सामान्यतः बटाटे शिजवताना आपण त्याची साल फेकून देतो.

परंतु बटाट्याच्या सालीमध्ये असलेल्या पोषक तत्वांबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही अशी चूक पुन्हा करणार नाही. 

बटाट्याच्या सालीचे फायदे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. बटाट्याची साल तुमच्या हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवते कारण त्यामध्ये असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या मदतीने रक्तदाब नियंत्रित केला जातो.

हाडे मजबूत

बटाट्याच्या सालीमध्ये कॅल्शियमसारखे अनेक महत्त्वाचे खनिजे असतात, त्यामुळे ते नैसर्गिकरित्या हाडे मजबूत करण्याचे काम करते. याचे कारण म्हणजे त्यामुळे हाडांची घनता वाढते.

रक्तदाब नियंत्रणात राहते

बटाट्यात पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते. तसेच यात व्हिटामिन सी देखील भरपूर प्रमाणात असते. या दोन्ही गोष्टी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात फायदेशीर असतात.

वजन नियंत्रणात राहते 

बटाट्याच्या सालीत मुबलक प्रमाणात फायबरही असते. त्यामुळे आपण त्यांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला फायबर मिळते. यात फायबर अधिक असल्याने बराच वेळ आपल्याला भूक देखील लागत नाही. परिणामी आपले वजन देखील नियंत्रणात राहते 

शरीराला ऊर्जा प्रदान करते

बटाट्याच्या सालीत कॅल्शियम आणि व्हिटामिन असल्याने, त्याच्या सेवनाने हाडांना मजबुती मिळते. व्हिटामिन बीमुळे शरीराला ताकद आणि दिवसभराची ऊर्जा मिळते. त्यामुळे शक्य तेवढ्या वेळा बटाटा हा सालीसकट खाण्याचा प्रयत्न करावा.

सकाळी लवकर उठण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा