सकाळ डिजिटल टीम
पावसाळ्यात लोक लवकर आजारी पडतात. पावसाळ्यात आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते.
यामुळे कोणत्याही रोगांची लागण लवकर होते. प्रत्येकानेच पावसाळ्यामध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात नियमितपणे हळदीचं दूध पिणं लाभदायक आहे. पावसाळ्यात रोज रात्री झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यावं.
पावसाळ्यात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. पावसाळ्यात च्यवनप्राशचे सेवन करा. आयुर्वेदामध्ये च्यवनप्राश एक उपयुक्त औषधी आहे.
पावसाळ्यात जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर गरम पाण्याची वाफ घेणे हा उत्तम घरगुती उपाय आहे. वाफ घेतल्याने कफपासूनही सूटका होईल.
पावसाळ्यात सर्दी झाल्यास किंवा घसा दुखत असल्यास लवंगाचं सेवन करा. शक्य असल्यास लवंग बारीक करून त्यात मध मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा खा. यामुळे खोकल्यापासून आराम मिळेल.
घशात कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होत असेल तर तुळशीचं सेवन करा.
तुम्ही तुळशीचा काढा बनवून पिऊ शकता.