बर्फाचं पाणी पिणं आरोग्यासाठी हानिकारक...

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळा जोरात सुरू आहे, त्यामुळे भरपूर पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे.

कडक उन्हात तुम्ही बर्फाचे पाणी पीत असाल तर ते तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकते.

बर्फाच्या पाण्याचा आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.

यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

बर्फाचे पाणी प्यायल्यावर सर्दी, घसा खवखवणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

बर्फाचे पाणी प्यायल्याने रक्तवाहिन्या आकसतात, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो.

थंड पाणी प्यायल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होते, ज्यामुळे चयापचय मंदावते.