गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की नाही?

Aishwarya Musale

हील्स

प्रत्येक मुलीला हील्स घालायला आवडतात. पण, या सर्व फॅशन फॉलो करण्यासाठी एक ठराविक वेळ आणि वय असतं. काही स्त्रिया गरोदरपणात हिल्स घालतात. पण, गरोदरपणात हिल्स घाल्याव्यात की नाही? असा प्रश्न अनेकांना पडतो.

गरोदरपणा

तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक स्त्रीने गरोदरपणाच्या सुरुवातीपासून बाळाला दूध पाजण्यापर्यंत ते बाळाला सांभाळण्यापर्यंत हिल्स घालू नये. यामागे कोणतेही वैज्ञानिक कारण नाही. पण, गर्भधारणेदरम्यान स्त्रियांचं वजन फार वाढतं.

या काळात हिल्स घातल्याने शरीराचं संतुलन बिघडू शकतं. आणि अनेक शारीरिक समस्या उद्भवू शकतात. अनेक महिलांमध्ये, गर्भधारणेदरम्यान पायांना सूज येते.

अशा वेळी, हिल्समुळे पायांना क्रॅम्प्स येणे तसेच पायांना सूज येणे यांसारखे प्रकार वाढू शकतात. तसेच, जास्त वेळ हिल्स घातल्याने पाठदुखीचा त्रासही होऊ शकतो.

गरोदरपणात हिल्स घातल्याने पाय दुखू शकतात. काही प्रकरणांमध्ये, गुडघेदुखी होऊ शकते. त्यामुळे गरोदरपणात हिल्स अतिशय काळजीपूर्वक घातली पाहिजे.

तसेच, बाळ लहान असताना, हिल्ससह बाळाला मांडीवर घेऊन बसण्यात अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून, बाळ चालायला लागेपर्यंत, आईने हिल्स घालणे टाळावे.

डॉक्टरांच्या मते, गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांत महिलांनी सावधपणे चालायला हवे. कारण या काळात थोडासा जरी धक्का लागल्याने किंवा पाय घसरल्याने गर्भपात होण्याचा धोका असतो.

तसेच, पहिल्या तिमाहीत हिल्स घालण्यास मनाई नाही. ऑफिसला जाणार्‍या स्त्रिया हलक्या टाचांच्या हिल्स घालू शकतात. पण, त्या पूर्ण सावधानतेने वापरणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचा पाय घसरणार नाही. 

अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखावी? 'या' टिप्स लक्षात ठेवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा