Aishwarya Musale
अनेकांना ब्रश करताना मळमळ आणि उलट्या होतात. असे होत असेल तर त्याचे कारण अॅसिडिटी किंवा अपचन असू शकते. अन्न पचत नाही तेव्हा पोटात पित्त तयार होते.
ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स होतो आणि व्यक्तीला वारंवार मळमळ होऊ लागते. काहींना उलट्याही होतात. पण याशिवाय आणखी काही गंभीर कारणे असू शकतात. काय आहेत ते जाणून घ्या.
दात घासताना मळमळ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पोटात अल्सर आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असू शकते.
यामुळे पचनाशी संबंधित समस्या होऊ शकते. पोटात वाढलेल्या ऍसिडमुळे मळमळ होऊ शकते आणि दात घासताना मळमळ वाढू शकते.
ब्रश करताना उलट्या होणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. कारण मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो तेव्हा पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात.
जेव्हा शरीरात क्रिएटिनिनची पातळी वाढते तेव्हा मळमळ संबंधित समस्या उद्भवू लागतात आणि पोटाशी संबंधित समस्या वाढतात. अशा परिस्थितीत लोकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास वारंवार होऊ लागतो.
तुम्हाला जर मळमळ होण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
यामुळे भविष्यातील आजार टाळता येतील. अनेक गंभीर आजारांपासूनही तुमचे रक्षण होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.