घाईघाईने खाण्याची सवय आरोग्यासाठी ठरू शकते घातक...

Aishwarya Musale

जेवताना प्रत्येक घास किमान 32 वेळा तरी चघळावा असं आयुर्वेदात म्हटलंय. यामुळे पचनाशी संबंधित बद्धकोष्ठता, गॅस आणि ॲसिडिटीशी संबंधित समस्या दूर होतात.

पण, आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना नीट जेवायलाही वेळ मिळत नाही. अशा वेळी घाईघाईने जेवणाच्या नादात लोक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. यामुळे अनेक आजारांचा सामना करावा लागतो.

घाईघाईने जेवण करायचे तोटे नेमके कोणते आहेत याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 

अन्न घशात अडकू शकते

जेव्हा आपण अन्न घाईघाईने खातो, तेव्हा आपण ते चघळण्याऐवजी थेट गिळतो, यामुळे अन्न घशात अडकू शकते आणि एखाद्या व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो. तसेच, जेव्हा तुम्ही अन्न चघळत नाही, तेव्हा शरीराला त्यातील पोषक तत्व मिळत नाहीत.

पचनसंस्थेसाठी हानिकारक

घाईघाईत खाल्ल्याने पचनासाठी आवश्यक असलेली तोंडातील लाळ आपले काम नीट करू शकत नाही आणि अन्नाचे पचन नीट न झाल्यास आंबट ढेकर येणे, पोट फुगणे , बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होतात. 

वजन वाढू शकते 

अनेक वेळा घाईघाईत खाल्ल्याने आपलं पोट नीट भरत नाही आणि त्यामुळे वारंवार भूक लागते. त्यामुळे पोट भरण्याच्या नादात अनेकदा अनहेल्दी पदार्थ खाल्ले जातात. यामुळे लठ्ठपणा वाढू शकतो. 

मधुमेहाची समस्या असू शकते

अनेकदा घाईघाईने जेवण्याच्या नादात आपण अन्न नीट चघळत नाही. यामुळे तुमचं वजन वाढू शकते. यामध्ये अनेकदा टाईप-2 मधुमेहाचा धोका जास्त असतो. मात्र, त्याबरोबरच मधुमेह आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात. 

कोलेस्ट्रॉल वाढू शकतो

जे लोक घाईत अन्न खातात त्यांच्या शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची कमतरता असते आणि वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतो. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढणे म्हणजे हृदयाशी संबंधित समस्या वाढणे. त्यामुळे जेवताना घाई करू नका. 

हिवाळ्यात चालायला हवंच! जाणून घ्या कारणं...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा