Aishwarya Musale
जेवणाची चव वाढवण्यासोबतच आपल्या स्वयंपाकघरात असलेली बडीशेप आरोग्यासाठीही चांगली आहे. आपल्यापैकी बरेच जण जेवणानंतर माउथ फ्रेशनर म्हणून बडीशेप खातात.
एक ग्लास बडीशेपचे पाणी प्यायल्याने पचनास मदत होते, शरीरातील सूज कमी होते, वजन कमी होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय ते प्यायल्याने शरीरात हायड्रेशन वाढते, रक्त शुद्ध होते आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
पण, बडीशेप पाणी पिण्याचा फायदा सर्वांनाच होतो असे नाही. बडीशेपच्या पाण्याचेही दुष्परिणाम होतात. कोणत्या लोकांनी बडीशेपचे पाणी पिणे टाळावे?
बडीशेपच्या बियांमध्ये ऍनेथोल असते. यात रक्त पातळ करणारे प्रभाव असतात. जर तुम्हाला ब्लीडिंग डिस्ऑर्डर असेल किंवा तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर बडीशेपचे पाणी पिण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
जेव्हा बडीशेप कमी प्रमाणात खाल्ली जाते, तेव्हा ती गर्भधारणेदरम्यान आणि स्तनपानादरम्यान सुरक्षित मानली जाते. परंतु, बडीशेप ब्रेस्टफीडिंग करताना जास्त प्रमाणात करू नये, कारण त्याचा बाळाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
बडीशेप बहुतेक लोकांसाठी सुरक्षित मानली जात असली तरी, हार्मोनल असंतुलन आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग किंवा एंडोमेट्रिओसिसने ग्रस्त असलेल्यांनी बडीशेप पाणी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अनेक लोकांची त्वचा संवेदनशील असते. अशा लोकांना बडीशेपचे पाणी प्यायल्याने अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो आणि चेहऱ्यावर पुरळ उठू शकते. अशा परिस्थितीत बडीशेपचे पाणी पिणे त्यांच्यासाठी योग्य ठरणार नाही.
जर तुम्हाला लो ब्लड शुगरची समस्या असेल तर तुम्ही बडीशेपचे पाणी पिणे टाळावे. बडीशेपमध्ये असे घटक आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर कमी होते आणि समस्या वाढू शकते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.