आरोग्यासाठी फायदेशीर आहे लिची, जाणून घ्या फायदे...

सकाळ डिजिटल टीम

लिची अतिशय रसाळ आणि गोड असते. हे फळ पोषक तत्वांनी भरपूर असले तरी लिचीमध्ये साखर भरपूर असते. त्यामुळे लिची खावी की नाही या संभ्रमात अनेकजण असतात.

लिचीमध्ये एपिकेचिन नावाचे कंम्पाउंड असते. हे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि कर्करोग आणि मधुमेहाचा धोका कमी करते.

लिचीमध्ये ऑलिगोनल नावाचे कम्पाउंड असते, जे नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यास मदत करते. नायट्रिक ऑक्साईड किंवा NO हे व्हॅसोडिलेटर आहे, जे रक्तवाहिन्या पसरवण्यास मदत करते. त्यामुळे ब्लड फ्लो प्रॉपर होते. 

लिची हा कॉपरचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. लिचीमधील कॉपर पेप्टाइड केसांना निरोगी ठेवते. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

लिचीमध्ये भरपूर पॉलिफेनॉल असतात. हे रक्तवाहिन्या मजबूत करते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.

लिचीमध्ये व्हिटॅमिन सी आणि ई असते. नियमितपणे लिची खाल्ल्याने सनस्ट्रोकचा धोका कमी होतो.

लिचीमध्ये फायटोकेमिकल्स असतात, जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट असतात. हे पेशींची असामान्य वाढ रोखण्यास मदत करते, मोतीबिंदू टाळण्यास मदत करते.

लिची फळामध्ये ऑलिगोनल असते, जे अँटी ऑक्सिडेंट देखील असते. हे उच्च चरबीयुक्त आहार (HFD) पचण्यास मदत करते. परिणामी, लिची खाण्यात कोणताही धोका नाही.