Aishwarya Musale
हाडे हे शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. हाडे मजबूत असेल तर शरीर सदृढ राहते. जेव्हा हाडांच्या आरोग्याचा विचार केला जातो तेव्हा लोक त्यांच्या आहारात कॅल्शियमचे प्रमाण वाढविण्याबद्दल बोलतात.
कॅल्शियम हाडांचे आरोग्य सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, परंतु केवळ कॅल्शियमने तुम्ही तुमच्या हाडांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेऊ शकत नाही. यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
असे काही पदार्थ आहेत जे हाडे कमकुवत करू शकतात. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही पदार्थांविषयी सांगत आहेत, ज्यांचा तुमच्या हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
जास्त साखर खाणे हाडांसाठी अजिबात चांगले मानले जात नाही. जेव्हा तुम्ही साखरेचे सेवन करता तेव्हा त्याचा शरीरातील फॉस्फरसच्या शोषणावर परिणाम होतो. फॉस्फरस हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते.
हाडांच्या आरोग्यासाठी फॉस्फरस अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नाही तर साखरेचे सेवन केल्याने तुमच्या मेंदूच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो.
रिफाइंड प्रोडक्ट्सचे सेवन करणे देखील हाडांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. या उत्पादनांमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे पोषक घटक नसतात. त्यामुळे तुमच्या हाडांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो.
कोल्ड ड्रिंक्स किंवा कोणत्याही प्रकारचे कार्बोनेटेड ड्रिंक हाडांच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. कार्बोनेटेड पेयांमधील फॉस्फोरिक अॅसिड तुमच्या रक्तातील आम्लता पातळी वाढवते.
मीठ आपल्या जेवणाची चव वाढवते, परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ खाणे हाडांसाठी हानिकारक आहे. तुम्ही जितके जास्त मीठ खाल तितके कॅल्शियम कमी होईल. जेव्हा सोडियमचे प्रमाण वाढते तेव्हा सोडियम आणि पोटॅशियममध्ये संतुलन नसते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.