Aishwarya Musale
गर्भपात होणे गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात खूप सामान्य आहे, परंतु हा एक वेदनादायक अनुभव आहे.
गर्भधारणेच्या 20 आठवड्यांपूर्वी गर्भधारणा गमावणे याला गर्भपात किंवा मिसकॅरेज म्हणतात. सोप्या भाषेत, जेव्हा मूल गर्भाशयात जगू शकत नाही, तेव्हा त्याला गर्भपात म्हणतात. आरोग्य अहवालानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भातील असामान्य गुणसूत्रांमुळे गर्भपात होतो.
याशिवाय गर्भामध्ये रक्त आणि पोषक तत्वांची कमतरता, कमकुवत गर्भाशय, संसर्ग, लैंगिक संक्रमण रोग आणि पीसीओएस ही देखील गर्भपाताची कारणे असू शकतात.
वाढते वय हे महिलांमध्ये गर्भपात होण्याचे सर्वात मोठे कारण असू शकते. गर्भपाताची सर्वाधिक प्रकरणे 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये आढळतात. वयाच्या 30 व्या वर्षी, 10 पैकी एका महिलेचा गर्भपात होतो, तर 45 व्या वर्षी, 10 पैकी 5 महिलांना या समस्येचा सामना करावा लागतो.
पेनकिलरचे सेवन
अनेक वेळा गरोदरपणात पेनकिलर वापरणे हानिकारक ठरू शकते. यामुळे गर्भाच्या विकासावर परिणाम होतो, ज्यामुळे गर्भपात होतो.
हार्मोनची कमतरता
गर्भाशयात बाळाच्या वाढीसाठी हार्मोन्सचे संतुलन असणे आवश्यक आहे. गर्भपात कधीकधी हार्मोनल असंतुलनामुळे होऊ शकतो.
ज्या महिला PCOD किंवा PCOS च्या समस्येने त्रस्त आहेत त्यांना जास्त धोका असतो.
गर्भधारणेदरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.