Aishwarya Musale
हिवाळ्यात नाक बंद होणे, डोकेदुखी, डोक्याच्या अर्ध्या भागात तीव्र वेदना होणे आणि नाकातून जास्त स्त्राव होणे ही सायनसची लक्षणे आहेत. ज्यामध्ये रक्तसंचय वाढल्याने नाकात जळजळ होते.
याबरोबरच पापण्यांच्या काठावर दुखणे, ताप येणे, तणाव, नैराश्य आणि चेहऱ्यावर सूज येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत धूळ आणि धूर समस्या आणखी वाढवू शकतात. या आजारावर वेळीच उपचार न केल्यास त्याचे पुढे अस्थमासारख्या गंभीर आजारात रूपांतर होऊ शकते.
सायनसची मुख्य कारणे म्हणजे थंडी, नाकाची हाडे वाढणे, प्रदूषण, ऍलर्जी, अनहेल्दी जीवनशैली, आपला आहार आणि हिवाळ्यातील थंड वारे. चला तर मग जाणून घेऊयात सायनसच्या समस्या टाळण्याचे काही सोपे उपाय.
अंटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले आलं सायनसमध्ये आणि सायनस टाळण्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. नाक बंद होण्यापासून आराम मिळतो आणि सायनुसायटिसपासून बचाव होतो.
आल्याचे चार ते पाच तुकडे पाण्यात उकळून हे पेय दिवसातून दोनदा प्यायल्याने सायनसपासून आराम मिळतो. हिवाळ्यात रोज तयार केलेला त्याचा काढा तुम्हाला आतून उबदार ठेवण्यास मदत करतो.
कांदा आणि लसूण दोन्ही समप्रमाणात एका भांड्यात पाण्यात उकळून दहा मिनिटे वाफवून घ्या. यामुळे सायनसच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
हिवाळा असो किंवा उन्हाळा असो स्वतःला हायड्रेट ठेवण्यासाठी दररोज तीन ते चार लिटर पाणी पिणे महत्त्वाचे आहे. हायड्रेटेड नसणे हे देखील अनेक रोगांचे मूळ आहे. शरीराला डिटॉक्स करण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे.
एक चमचा कच्च्या हळदीची पेस्ट आणि एक कप दूध गरम करून त्यात मध टाकून प्यायल्याने सायनसपासून आराम मिळतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.