Aishwarya Musale
भोपळ्याची भाजी स्वादिष्ट आणि आरोग्यदायी असतेच, पण भोपळ्याच्या बिया देखील आरोग्यासाठी चांगल्या असतात. या बियांमध्ये अनेक पोषक घटक असतात.
यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या दूर ठेवता येतात. भोपळ्याच्या बिया पौष्टिक असतात. यामध्ये झिंक, आरोग्यदायी फॅट्स आणि मॅग्नेशियम असतं.
या बियांचं सेवन केल्यास शरीराला ऊर्जा मिळते. भोपळ्याच्या बियांमध्ये फायबर मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे पोटदुखीची समस्या दूर होते. तसंच ब्लोटिंगचा त्रास दूर होऊन आराम मिळू शकतो.
भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर असला तरीही, काही लोकांसाठी मात्र भोपळा हानिकारक ठरतो. त्यामुळे भोपळ्यापासून जेवढं लांब राहता येईल तेवढं चांगलं.
जर तुम्ही लठ्ठपणानं त्रस्त असाल तर भोपळ्याच्या भाजीचं सेवन करू नका, कारण यामुळे तुमचं वजन आणखी वाढेल. तसेच, पचनाच्या समस्याही उद्भवतील.
जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचं सेवन केलं तर तुम्हाला सूज येण्यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. मधुमेहाच्या रुग्णांनी याचं सेवन करू नये. यामुळे रक्तातील साखर वाढते.
भोपळ्याची भाजी खाल्ल्यानं ॲलर्जीची समस्या वाढू शकते. त्यामुळे त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. याचं सेवन केल्यानं हात आणि पायांवर लाल पूरळ येऊ शकतात.
जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर अशावेळी भोपळ्याची भाजी खाणं टाळावं. यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. यामुळे उलट्या होऊ शकतात.