Aishwarya Musale
स्ट्रॉबेरीचे नाव ऐकताच तुमच्या तोंडाला पाणी आलेच पाहिजे कारण तिची गोड आणि आंबट चव आपल्यापैकी बहुतेकांना आकर्षित करते. स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी चांगली असते, कारण त्यामध्ये आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात.
यामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज, फोलेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय, स्ट्रॉबेरीमध्ये अँटिऑक्सिडेंट देखील असतात, जे आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
स्ट्रॉबेरीमध्ये फायबर, फ्लेव्होनॉइड्स आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
स्ट्रॉबेरी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शनशी लढण्यास आणि संपूर्ण आरोग्य सुधारण्यास मदत करते.
स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससारखे इतर पोषक घटक असतात, जे डोळ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावतात.
स्ट्रॉबेरीमध्ये खूप कमी कॅलरीज आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही हे एकदा खाल्ले तर तुम्हाला जास्त वेळ भूक लागणार नाही. अशावेळी तुमचे वजन हळूहळू कमी होऊ लागते.
स्ट्रॉबेरी आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तरूण दिसते.
म्हणून ज्यांना त्वचेच्या काही समस्या असतील तर त्यांनी देखील स्ट्रॉबेरी खाणे चांगले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.