Aishwarya Musale
किडनी आणि मूत्र विकारांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी या वनस्पतीची पाने खूप फायदेशीर मानली जातात. यासोबतच पोटात जमा झालेले विषारी घटक बाहेर काढतात.
बहुतेक लोक याचा वापर स्टोनची समस्या दूर करण्यासाठी करतात. हे किडनी स्टोन लवकर काढण्याचे काम करते.
यासोबतच पानफुटीचा काढा बनवून प्यायल्यास लघवीला जळजळ होणे, वारंवार लघवी होणे आदी समस्या दूर होतात.
जळजळ बरी करण्यासाठी पानफुटीची पाने रामबाण उपाय म्हणून काम करतात. आयुर्वेदात याचा उपयोग अनेक प्रकारे करता येतो.
पण सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याची ४-५ पाने बारीक करून पेस्ट बनवा आणि ती दुखापतीवर लावा. असे केल्याने दुखण्यापासून आराम तर मिळेलच पण खाज येण्याची समस्याही दूर होईल.
रक्तरंजित जुलाब थांबवण्यासाठी पानफुटी खूप प्रभावी आहे. जर तुम्ही पोटाच्या समस्या किंवा रक्तरंजित डायरियाने त्रस्त असाल तर याच्या पानांचा रस तुम्हाला आराम देईल.
योनीमार्गातील संसर्ग बरा करण्यासाठी देखील पानफुटी खूप फायदेशीर मानले जाते.
एखाद्या स्त्रीला योनीमार्गात संसर्ग, खाजगी भागात खाज सुटणे, जळजळ होणे आणि योनीतून स्त्राव होण्याची समस्या असेल तर पानफुटीची पाने पाण्यात उकळून काढा बनवा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.