Aishwarya Musale
टोमॅटो सूप अनेक तत्वांचा असा घटक आहे जो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
यामध्ये जीवनसत्व ए, सी, ई आणि के, आवश्यक खनिजे आणि अँटीऑक्सीडेंट असतात जे तुम्हाला स्वस्थ आणि निरोगी ठेवतात.
टोमॅटोचा आहारात समावेश लाभदायक आहे, टोमॅटो सूपमध्ये आरोग्यदायी घटक आहेत. ज्याचे पुढीलप्रमाणे लाभ होतात.
टमाटर सूपमध्ये विटामिन सीचा उच्चस्तर धमण्यांना सुरक्षा प्रदान करते, हृदयाला मजबूत करते आणि स्ट्रोक सारख्या रोगांपासून बचाव होतो. खराब कोलेस्ट्रॉलला कमी करण्यासाठी देखील मदत करू शकते.
टोमॅटो सूपमधील सेलेनियम रक्ताभिसरण वाढवते, अशक्तपणा टाळते. टोमॅटो सूपचा एक आश्चर्यकारक फायदा म्हणजे टोमॅटो सूपच्या एका वाटी मध्ये 7 मायक्रोग्राम सेलेनियम मिळते.
टोमॅटो सूपमध्ये तांब्याचे उच्च प्रमाण मज्जासंस्थेला चालना देते. या सर्व गोष्टी तुमचे मानसिक आरोग्य उत्तम स्थितीत ठेवण्यासाठी मदत करतात.
जे लोक वजन कमी करण्याचा आहार घेत आहेत त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकते. यामध्ये भरपूर पाणी आणि फायबर असते जे तुमचे पोट दीर्घकाळ पोट भरून ठेवते.
आहारतज्ञ वजन कमी करण्याचा एक स्वादिष्ट मार्ग म्हणून शरीरासाठी कमी-कॅलरी आणि कमी चरबीयुक्त आहार म्हणून टोमॅटो सूपची शिफारस करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.