जास्त बदाम खाल्ल्याने होऊ शकतात 'हे' तोटे, जाणून घ्या

Manoj Bhalerao

बदाम

बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु ते जास्त प्रमाणात खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

बदाम खाण्याचे तोटे

बदामामध्ये हेल्दी फॅट्स, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि फायबर आढळतात, त्यामुळे लोक त्याचे जास्त सेवन करतात. पण तुमच्यासाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की जास्त प्रमाणात काहीही खाल्ल्याने फारसा फायदा होत नाही.

प्रमाण

जर तुम्हाला बदामाचे सर्व फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही त्याचे सेवन मर्यादित प्रमाणात केलं पाहिजे. जास्त प्रमाणातील सेवन टाळावे.

व्हिटॅमिन ई ओव्हरडोज

त्वचा, डोळे आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी व्हिटॅमिन ई खूप महत्त्वाचे मानले जाते. तथापि, ते जास्त प्रमाणात सेवन केल्याने व्हिटॅमिन ई विषारी होऊ शकते. त्यामुळे पोटदुखी, जुलाब आदी समस्यांना सामोरे जावे लागते.

वजन वाढणे

कॅलरीजबरोबरच हेल्दी फॅट्सही बदामामध्ये आढळतात. याचे जास्त सेवन केल्याने तुमचे वजन वाढू शकते.

मुतखडा

बदामामध्ये ऑक्सॅलेट्स आढळतात. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरात ऑक्सलेटचे प्रमाण वाढू शकते. हे ऑक्सलेट किडनीला चिकटून राहतात आणि खडे बनू लागतात.

नट ऍलर्जी

बदाम खाल्ल्याने अनेकांना नट ऍलर्जीचा सामना करावा लागू शकतो. हे खाल्ल्याने अनेकांना चेहऱ्यावर सूज येणे आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

किती खावे

तुम्ही एका दिवसात फक्त 50 ग्रॅम बदाम खावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.