सकाळ डिजिटल टीम
सध्याच्या धावपळीच्या जीवनात कोणालाच स्वतःसाठी आणि खाण्यासाठी वेळ देता येत नाहीये.
त्यामुळे ऑफिसला जाण्याआधी लोक रात्री फळे कट करुन टिफिनमध्ये पॅक करतात.
जर तुम्हीही अशी फळे घेऊन जात असाल, तर ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. याने फक्त एकच आजार नाही, तर अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
रात्री कापून ठेवलेली फळे खाल्ल्यास तुम्हाला फूड पॉयझनिंगच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. असे केल्याने पोटदुखी किंवा जळजळ होऊ शकते. तसेच ही फळे तुमच्या पचनसंस्थेसाठी अजिबात चांगली नसतात.
फळे कापून ठेवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. फळे खाल्ल्याने जे फायदे मिळतात, ते फळे कापून काही तासांनी खाल्ल्याने मिळू शकत नाहीत. या अशा फळांतील व्हिटॅमिन सी कमी होते.
कापलेली फळे खाल्ल्याने अतिसाराचा धोका वाढतो. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा वातावरणात जास्त आर्द्रता असते, तेव्हा या फळांमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू वाढू लागतात आणि ते फळांवर थर तयार करतात.
जर तुम्हाला दररोज ऑफिसमध्ये फळे खायची असतील, तर ती पॅक करण्याऐवजी ऑफिसमध्ये न्या आणि खा.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.