सकाळ डिजिटल टीम
दही हे गुणांचे भांडार आहे, परंतु असे असूनही काही गोष्टींसोबत ते खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते.
दह्यामध्ये सोडियम, पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन डी यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
दही हे दुधापासून आंबवून तयार केले जाते. त्यामुळे त्यात अब्जावधी बॅक्टेरिया असतात. ह्या चांगल्या बॅक्टेरिया शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात.
पण, आयुर्वेदात काही गोष्टींमध्ये दही मिसळून खाण्यास मनाई आहे. पावसाळ्यात काही गोष्टींसोबत दही खाऊ नये, अन्यथा ते तुमच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते.
दह्यासोबत तुपाचे सेवन करू नये. तुपामध्ये फॅट्स असतात. तुपासह दही सेवन केल्यास चयापचय मंद होतो. यामुळे आळस आणि झोप येते.
दुधानंतर दही कधीही खाऊ नये. केवळ दहीच नाही, आंबवलेला कोणताही पदार्थ दुधासोबत खाऊ नये. असे केल्याने तुम्हाला पोटदुखीबरोबरच पचनाच्या इतर अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
कांद्यापासून बनवलेल्या कोणत्याही पदार्थासोबत दही वापरू नये. कांदा आणि रायता एकत्र खाल्ल्याने तुमच्या चेहऱ्यावर मुरुम, त्वचेची जळजळ आणि ॲलर्जीची समस्या उद्भवू शकते.
आंबट फळांसोबत दही खाऊ नये. टोमॅटो, हंगामी फळे, लिंबू किंवा इतर फळे यापासून दूर ठेवा. दही कधीही खरबुजासोबत खाऊ नये. आयुर्वेदात हे दोन पदार्थ एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात.
टीप : आम्ही ही माहिती (लेख) सामान्य माहितीच्या आधारे प्रसिद्ध केली आहे. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.