Mung Beans Benefits : मोड आलेले मूग आरोग्यासाठी का आहे फायदेशीर? जाणून घ्या महत्व

सकाळ डिजिटल टीम

सकाळचा नाश्ता उत्तम आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, असं मानलं जातं.

Mung Beans Benefits

नाश्त्यासाठी अंकुरलेला अर्थात मोड आलेला मूग खूप फायदेशीर मानला जातो.

Mung Beans Benefits

यामध्ये फायबर, अमिनो ॲसिड, अँटिऑक्सिडंट्सचे खूप चांगले स्त्रोत आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप महत्वाचे ठरतात.

Mung Beans Benefits

मोड आलेल्या मुगाचे फायदे

तुम्ही सकाळी उठून अंकुरलेले मूग खाण्यास सुरुवात करा. हा एक पौष्टिक आणि आरोग्यदायी अन्नपदार्थ आहे. याचे सेवन केल्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहते. शिवाय, तुम्हाला अनेक आजारांपासून आराम मिळतो.

Mung Beans Benefits

वजनावर नियंत्रण

अंकुरित मुगामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते खाल्ल्याबरोबर पचते. मोड आलेले मूग खाल्ल्याने पोटाची चरबी वाढत नाही आणि उंचीनुसार वजन संतुलित राहते.

Mung Beans Benefits

पोटदुखीचा त्रास

ज्यांना पोटदुखीचा त्रास होत असेल, त्यांनी ताबडतोब मोड आलेल्या मुगाचे सेवन सुरू करावे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 'यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे शरीरातील पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते.'

Mung Beans Benefits

प्रोटीनचा चांगला स्रोत

अंकुरलेल्या मुगामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. हे स्नायू तयार करण्यास आणि दुरुस्त करण्यास मदत करते. याच्या सेवनाने शरीर मजबूत आणि शक्तिशाली बनते.

Mung Beans Benefits

हृदयासाठी फायदेशीर

मोड आलेल्या मुगात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते, जे हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यास खूप मदत करते. दररोज सकाळी याचे सेवन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.

Mung Beans Benefits

Karela Juice Benefits : आठवड्यातून किती वेळा कारल्याचा ज्यूस प्यावा? जास्त प्यायल्यास काय होऊ शकतं?

Karela Juice Benefits | esakal
येथे क्लिक करा