सकाळ डिजिटल टीम
सुपारी भारतात अनेक शुभ कार्यात वापरली जाते. पण, तुम्हाला माहित आहे का की, पान मसाल्यांमध्ये वापरण्यात येणारी सुपारी आरोग्याच्या दृष्टीने खूप धोकादायक आहे.
सुपारी शरीराला अशा प्रकारे हानी पोहोचवते, की जगातील अनेक देशांमध्ये त्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
सुपारी खाल्ल्याने कॅन्सरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, त्यामुळे सुपारी खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा, की तोंडाच्या कॅन्सरचा धोका चार पटीने वाढण्याची शक्यता असते. कारण, ते सर्व घटक सुपारीत आढळतात, जे कर्करोगाशी कारणीभूत आहेत.
नियमितपणे सुपारी खाल्ल्याने हिरड्या सैल होतात आणि दातांवरही याचा विपरित परिणाम होतो.
सुपारी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित अनेक आजारांचा धोकाही वाढतो. यासोबतच सुपारीचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
सुपारी खाल्ल्याने हृदयाशी संबंधित आजार तर होतातच, पण लठ्ठपणाही वाढतो.
सुपारीत अनेक विषारी घटक असतात. जे शरीरात पोहोचल्यानंतर आणि इतर घटकांशी संपर्कानंतर काही वायू आणि रासायनिक पदार्थ बाहेर टाकतात, जे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात.