Lactose Free Milk हे 8 प्रकारचे दूध आहेत लॅक्टोज फ्री, बिनधास्त करा सेवन

सकाळ डिजिटल टीम

लॅक्टोज फ्री गाईचे दूध

दुधाचे पचन सहजरित्या व्हावे, यासाठी लॅक्टोज फ्री गाईच्या दुधाचे आपण सेवन करू शकता. या दुधाची चव देखील दैनंदिन वापरातील दुधाप्रमाणेच असते.

Lactose Free Milk | sakal

बदामाचे दूध 

बदामापासून तयार करण्यात येणाऱ्या दुधात नैसर्गिकरित्याच लॅक्टोजचे प्रमाण नसते. या दुधाची चव अक्रोडप्रमाणे लागते.

Lactose Free Milk | sakal

सोया मिल्क

सोयाबीन हे प्रोटीनचा एका चांगला स्त्रोत आहे. गाईच्या दुधास पर्याय म्हणून बहुतांश जण या दुधाचा डाएटमध्ये समावेश करतात.

Lactose Free Milk | sakal

ओट मिल्क

ओट्सपासून तयार करण्यात येणाऱ्या दुधामध्ये घट्ट मलई असते आणि हे दूध चवीला थोडेसे गोडही असते. याचा वापर आपण कॉफी किंवा अन्य रेसिपींमध्ये करू शकता. 

Lactose Free Milk | sakal

तांदुळाचे दूध

डेअरी फ्री प्रोडक्ट म्हणून फिटनेस फ्रीक मंडळी या दुधाचा डाएटमध्ये समावेश करतात.

Lactose Free Milk | sakal

नारळाचे दूध

नारळ किसून त्यापासून पारंपरिक पद्धतीने दूध तयार केले जाते. हे दूधही आरोग्यास पोषक असते.

Lactose Free Milk | sakal

काजूचे दूध 

काजू व पाणी समप्रमाणत एकत्रित घ्या. दोन्ही सामग्री मिक्सरमध्ये वाटा व यानंतर काजूचे पाणी एका भांड्यामध्ये गाळा. तयार आहे काजूचे दूध.

Lactose Free Milk | sakal

मॅकाडॅमिया नट्स 

मॅकाडॅमिया नट्सपासून तयार केलेल्या दुधाची चव लोण्याप्रमाणे लागते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lactose Free Milk | sakal