Green Tea Benefits : 'ग्रीन टी'चं कधी सेवन करावं आणि कधी करू नये? जाणून घ्या..

सकाळ डिजिटल टीम

जेवणाच्या एक तासापूर्वी ग्रीन टी पिणे फायदेशीर मानले जाते. कारण, त्यात टॅनिन असतात.

Green Tea Benefits

जेवल्यानंतर लगेच त्याचे सेवन करू नका. कारण, यामुळे मळमळ, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी होऊ शकते.

Green Tea Benefits

जर तुम्ही दिवसातून ३ कपपेक्षा जास्त प्यायले, तर ते निश्चितपणे नुकसान करते. झोपण्यापूर्वी हे प्यायल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.

Green Tea Benefits

दिवसातून दोनपेक्षा जास्त वेळा ग्रीन टी पिणे देखील आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. जर एखाद्याला अॅनिमियाचा त्रास असेल, तर त्याने ग्रीन टीचे सेवन करू नये.

Green Tea Health Benefits

ग्रीन टीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे ते जास्त प्रमाणात प्यायल्याने तुमच्या शरीरात डिहायड्रेशन, डोकेदुखी, उलट्या आणि मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

Green Tea Benefits

ग्रीन टी जास्त प्यायल्याने झोपेमध्ये व्यत्यय येतो. जे लोक पूर्वीपेक्षा कमी झोपतात त्यांनी ग्रीन टी पिऊ नये. यामुळे निद्रानाश होऊ शकतो.

Green Tea Benefits

ग्रीन टीचे जास्त सेवन केल्याने हाडांचे आरोग्य आणि यकृत खराब होण्याची शक्यता वाढते, असे तज्ज्ञ सांगतात.

Green Tea Benefits

Green Tea पिण्याचे कोणते आहेत आरोग्यदायी फायदे? कर्करोग ते वजन कमी करण्यापर्यंत ठरु शकते उपयुक्त!

Green Tea Health Benefits
येथे क्लिक करा