Harshada Shirsekar
आरोग्य निरोगी राहण्यासाठी व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचाही समावेश करणं आवश्यक आहे.
यासाठी सकाळी रिकाम्या पोटी आपण काही औषधी पानेही चावून खाऊ शकता. ज्यामुळे कित्येक आजारांपासून आरोग्याचं संरक्षण होण्यास मदत मिळेल.
या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरिअल गुणधर्म असतात, ज्यामुळे तोंडातील जंतूचा खात्मा होतो. शिवाय शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते. महत्त्वाचे म्हणजे रक्तातील शर्कराही नियंत्रणात राहते.
तुळशीचे पाने चावून खाल्ल्यास सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होतो.
कढीपत्त्याच्या पानांमध्ये हायपोग्लायसेमिक इंडेक्सची पातळी कमी असते. या पानांचे चावून सेवन केल्यास मधुमेहाची समस्या नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
पेरूच्या पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह या पोषणतत्त्वांचा साठा असतो. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते.
पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास पोटाच्या आरोग्यास बरेच लाभ मिळतात. छातीत जळजळणे, गॅस, अपचन यासारख्या समस्यांपासून सुटका होण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.