सकाळ डिजिटल टीम
अनेक दिवसांपासून खोकल्यासह अनेक औषधांच्या तक्रारी येत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला काय खरेदी करावे आणि काय नाही हे समजत नाही.
न्यूरो आणि स्पाइन सर्जन डॉ. विकास (Dr. Vikas) यांनी त्यांच्या ट्विटरवर औषधे खरेदी करण्यापूर्वी कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत पोस्ट शेअर केली आहे.
औषधे बनावट किंवा निकृष्ट दर्जाची असणे हे खूप धोकादायक आहे. खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याबाबत सर्वांनाच माहिती आहे.
जीव वाचवण्यासाठी आपण घेत असलेल्या औषधात काही चूक झाली असेल, तर ती आपल्या जीवाला धोका निर्माण करू शकते. त्यामुळे बनावट आणि अस्सल औषधे कशी ओळखता येतील?
नेहमी परवानाधारक दुकानातून औषधे खरेदी करा आणि त्याचं बिल घ्या.
ऑनलाइन औषधे खरेदी करणे टाळावे. कारण, त्यात फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते.
औषधांची किंमत आणि ऑफर - अनेकदा तुम्हाला बनावट औषधे खूप स्वस्त आणि सवलतीत मिळतील.
जर तुम्हाला औषधाच्या छपाईमध्ये स्पेलिंग चूक किंवा डिझाईनमध्ये फरक दिसला, तर ते औषध बनावट असू शकते याची काळजी घ्या.
औषधांवर बॅच क्रमांक, उत्पादन तारीख आणि कालबाह्यता तारीख लिहिली असली पाहिजे.
जर तुम्हाला औषधाच्या पाकिटावर बारकोड, युनिक कोड किंवा QR कोड दिसत नसेल, तर आमचा सल्ला आहे की, ती औषधे खरेदी करणे टाळा.
तुम्ही काळजीपूर्वक पाहिल्यास, बनावट औषधाचा वरचा थर सहसा सुकलेला आणि खराब झालेला आढळेल.