थंडीच्या दिवसात अशी घ्या आरोग्याची काळजी...

Aishwarya Musale

हिवाळा

हिवाळ्यात प्रत्येकाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. परिणामी अनेकजण आजारी पडतात. अशातच तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने अनेक आजारांना या दिवसात दूर ठेवता येऊ शकते.

काळी मिरी व तुपाचे सेवन

तुपामध्ये व्हिटामिन ए, ई, के आणि ओमेगा ३ सारखी पोषकतत्वे असताता ती शरीराला मजबूत करतात. तर काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटीबॅक्टेरियल गुण इन्फेक्शनपासून लढण्यास मदत करतात. हे दोन्ही मिसळून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ

तूप आणि काळी मिरीचे सेवन आपली रोगप्रतिकारक क्षमता मजबूत करण्यास मदत करतात. काळी मिरीमधील अँटी ऑक्सिडंट फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. या पद्धतीने दोन्हींचे मिश्रण आजारांशी लढण्यास मदत करतात.

सर्दी-खोकल्यापासून सुटका

थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकल्यासारख्या समस्या होणे ही सामान्य बाब आहे. अशातच तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने फायदा होतो. तुपातील उष्णतेमुळे शरीराला ऊब मिळते आणि श्वास नलिका साफ होण्यास मदत होते.

हाडांच्या दुखण्यापासून सुटका

थंडीच्या दिवसात सांधेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणावर जाणवतो. मात्र तूप आणि काळी मिरीच्या सेवनाने यामुळे आराम मिळू शकते.

सांधेदुखीचा त्रास

तुपामधील उबदारपणामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते. यामुळे सांध्यांना वंगण मिळते.

हृदय आणि लिव्हरसाठी फायदेशीर

तज्ञांच्या मते तूप आणि काळी मिरी खाल्ल्याने हृदय आणि लिव्हरचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते.

हृदयाचे आरोग्य

तुपामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते जे हृदय रोगांचा धोका कमी होतो. यामुळे रक्त संचलन चांगल्या पद्धतीने होते. तसेच हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

अचानक बीपी कमी झाला तर करा हे घरगुती उपाय...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

bp | sakal
येथे क्लिक करा