सकाळ डिजिटल टीम
दृष्टी वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता. या घरगुती उपायांनी तुम्ही तुमची दृष्टी सहज वाढवू शकाल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
या नैसर्गिक गोष्टी तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतात. चला जाणून घेऊया अशा काही खाद्यपदार्थांबद्दल, ज्यामुळे तुम्ही दृष्टी वाढवू शकता.
पालकामध्ये 'जीवनसत्त्व-ए, ई, झिंक, लोह' भरपूर प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासोबतच डोळ्यांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.
कढीपत्त्यात 'जीवनसत्त्व - ए' मुबलक प्रमाणात आढळते. जीवनसत्त्व-एमुळे आपले डोळे निरोगी राहतात. कढीपत्त्याच्या सेवनाने डोळे निरोगी राहतात.
मेथी आरोग्यासाठी, तसेच डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानली जाते. सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे सेवन केल्याने डोळे सशक्त होतात.
आवळा हा 'जीवनसत्त्व-सी'चा उत्तम स्रोत मानला जातो. जीवनसत्त्व-सीयुक्त आवळा तुमची दृष्टी वाढवण्यास मदत करतो.
बडीशेपमुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. बडीशेपमध्ये 'जीवनसत्त्व-ए' आणि 'ई' आढळतात, जे डोळे निरोगी ठेवतात. बडीशेपचे पाणी पिणेदेखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.