Aishwarya Musale
आजकाल बऱ्याच जणांना तरूणवयातच दातदुखीची समस्या असल्याचे दिसून येते. तुमचं वयही 20 से 30 च्या दरम्यान असेल आणि तुम्हाला दातात वेदना किंवा काही त्रास जाणवत असेल.
तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण झाल्याचे हे संकेत आहेत. दातांना हाडांचा सपोर्ट असतो.
जर हाडं कमकुवत झाली असतील किंवा हिरड्यांमध्ये एखादी समस्या अथवा इन्फेक्शन झाले असेल तर त्याचा परिणाम दातांवर होतोच.
दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी आपल्या मौखिक आरोग्याची म्हणजेच ओरल हेल्थची पुरेशी काळजी घेणे अतिशय महत्वाचे असते.
दातांची नियमितपणे सफाई करणे आणि रेग्युलर चेकअप करणेही गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर चांगल्या दातांसाठी हाडंही मजबूत असली पाहिजेत.
ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे, अशा रुग्णांमध्ये दात पडण्याची समस्या अधिक असते. अशा परिस्थितीत जर तुमची ब्लड शुगर लेव्हलही वाढलेली असेल तर धोका पोहोचू शकतो.
त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य औषधे तसेच आहारही घ्या. पुरेसा व्यायाम करणेही या परिस्थितीत फायदेशीर ठरते.
तंबाखूचे सेवन आणि मद्यपान करू नये, प्रत्येकाने सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळा दात स्वच्छ घासावेत. तसेच काहीही खाल्ल्यास खळखळून चूळ भरावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.