सकाळ डिजिटल टीम
आपला फिटनेस जपण्यासाठी बहुतांश लोक मॉर्निंग वॉक करतात. आरोग्य तज्ञही दररोज सुमारे 5000 पावले चालण्याचा सल्ला देतात.
दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे चालणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात येते.
रिकाम्या पोटी धावलात तर तुमचा लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी धावणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.
रिकाम्या पोटी धावालात किंवा चाललात तर हृदयविकाराचा धोका कमी होतो. दररोज 10-15 मिनिटे धावले पाहिजे. त्यामुळं हृदयाचे पंप योग्यरित्या करते आणि रक्त परिसंचरण सुधारते.
रिकाम्या पोटी चालल्याने किंवा धावल्याने पचनक्रिया सुधारते, आतड्यांसंबंधी पेटके, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या पाचक समस्या दूर होतात.
रिकाम्या पोटी चाललात किंवा धावलात तर तुम्हाला थकवा लवकर जाणवतो. त्यामुळं मॉर्निंक वॉकला जाण्यापूर्वी खजूर यांसारखे हेल्दी पदार्थ खा.
रिकाम्या पोटी चालल्याने आणि धावल्याने शरीरात ऊर्जा कमी होते.