Harshada Shirsekar
सकाळी लवकर उठणे गरजेचं आहे, हे सर्वांनाच माहीत आहे.
पण सकाळी उठण्याची योग्य वेळ अनेकांना माहीत नाहीय, जाणून घेऊया सविस्तर माहिती.
सकाळी लवकर उठणे आरोग्यासाठी लाभदायक असते. त्यामुळे पहाटे ५.३० ते ६ वाजेदरम्यान उठावे.
सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्यास व्हिटॅमिन डीचा पुरवठा होईल. शिवाय यामुळे मन देखील शांत राहते. म्हणून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्या.
डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहावे, यासाठी रोज सकाळी लवकर उठावे. यानंतर दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर घासा आणि उबदार पंजे डोळ्यांवर ठेवा. असे केल्यास डोळ्यांना आराम मिळतो.
सकाळी लवकर उठल्यास दिवसभर आपण फ्रेश राहू शकता. तसेच काम करण्यासाठी शरीरामध्ये ऊर्जा देखील टिकून राहील.
सकाळी लवकर उठल्यास रात्री देखील आपल्याला लवकर झोप येईल. तसेच रात्रीची चांगली झोप मिळेल.
सकाळी लवकर उठल्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते. ज्यामुळे सकारात्मकता वाढते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.