Harshada Shirsekar
'व्हिटॅमिन सी'सह अन्य पोषणतत्त्वांचा उत्तम स्त्रोत म्हणजे संत्रे. नियमित या फळाचे सेवन केल्यास आरोग्यास अगणित लाभ मिळतील.
नियमित संत्रे खाल्ल्याने आरोग्यास मिळणारे फायदे जाणून घेऊया सविस्तर.
संत्र्याच्या सेवनामुळे त्वचेच्या आरोग्यास मोठ्या प्रमाणात लाभ मिळतात. यातील व्हिटॅमिन सी पोषणतत्त्वामुळे त्वचेवर नॅचरल ग्लो येतो.
डाएटमध्ये संत्रे या फळाचे समावेश केल्यास डोळ्यांच्या आरोग्यास फायदे मिळतात. दृष्टी सुधारते तसंच डोळ्यांशी संबंधित सर्व समस्या देखील कमी होण्यास मदत मिळू शकते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते. तसेच कित्येक आजारांपासूनही आरोग्याचे संरक्षण होण्यास मदत मिळते.
रक्तदाबाची समस्या असणाऱ्या रुग्णांनी डाएटमध्ये संत्र्याचा समावेश नक्की करावा. कारण यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येण्यास मदत मिळू शकते.
संत्र्याच्या सेवनामुळे त्वचेसह केसांच्या आरोग्यासही लाभ मिळतात. यातील पोषणतत्त्व केसांच्या वाढीस पोषक आहेत.
संत्र्यातील पोषणतत्त्वामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.