सकाळ डिजिटल टीम
Health Tips Gallstones : पित्ताशयातील खडे (Gallstones) हा आजकाल खूप सहजपणे आढळणारा आजार आहे. याचेप्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
हा आजार टाळण्यासाठी काय करावे? डॉ. अभिजित पाटील (रत्नागिरी) यांच्या मते, जेवणातील तेल-तुपाचे प्रमाण योग्य असावे म्हणजे फोडणीसाठी माफक तेल भातावर थोडे साजूक तूप इतके चालेल.
जेवणात पनीर खोबरे व शेंगदाण्याचा ही वापर माफक करावा.
तळलेले पदार्थ फास्ट फूड वरचेवर खाऊ नये. जेवणात रोज कोशिंबीर व सलाड घ्यावे.
चिकू, सफरचंद, पपई, संत्री, मोसंबी, केळी अशी फळे खावीत.
रोज नियमित व्यायाम घ्याव्या. रोज एक तास चालायला जावे.