सकाळ डिजिटल टीम
जास्त वेळ चुकीच्या आसनात बसल्याने किंवा इतर अनेक कारणांमुळे लोकांना पाठदुखीचा त्रास सुरू होतो. यापासून आराम मिळवण्यासाठी काय करावे?
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी काही घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो.
पाठदुखी कमी करण्यासाठी 2-3 लसणाच्या पाकळ्या रिकाम्या पोटी पाण्यासोबत गिळून घ्या. याशिवाय, खोबरेल किंवा मोहरीच्या तेलात लसणाच्या पाकळ्या गरम करून पाठीला मसाज करा. यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
पाठदुखी आणि सूज कमी करण्यासाठी बर्फ किंवा कोमट पाणी अंगाला लावा, यामुळे दुखण्यापासून आराम मिळतो.
पाठदुखी आणि सूज कमी करण्यासाठी एरंडेल तेलाने मसाज करा. यामुळे पाठीत रक्ताभिसरण सुधारण्यास आणि दुखण्यापासून आराम मिळतो.
पाठदुखीपासून आराम मिळवण्यासाठी 1 कप पाण्यात 8-10 तुळशीची पाने घालून चांगले उकळून घ्या. पाणी अर्धे झाले की, त्यात मीठ टाकून सेवन करा. यामुळे वेदना कमी होईल.
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. त्याची पेस्ट बनवून पाठीवर लावा आणि सुकल्यानंतर पाण्याने धुवून निलगिरीचे तेल लावा. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते.
पाठदुखी आणि सूज कमी करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ मिसळून घ्या आणि त्यानंतर ते आपल्या शरीराला लावा.