Aishwarya Musale
सफरचंद प्रत्येक ऋतूत मिळत असले तरी हिवाळ्यात खूप चांगले सफरचंद पाहायला मिळतात. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे.
ज्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्ब आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात.
यामध्ये पीएच पातळी 3 आणि 3.5 पर्यंत असू शकते. जरी ते लिंबाच्या तुलनेत कमी आम्लयुक्त आहे. परंतु असे असूनही, आपण प्रत्येक आहारासह सफरचंद खाऊ शकत नाही.
सफरचंद खाताना आपण अनेकदा काही चुका करतो ज्या करू नये. सफरचंद खाताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
ज्या लोकांना गॅस आणि अपचन म्हणजेच पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे टाळावे.
काही लोक दुग्धजन्य पदार्थांसह सफरचंद खातात. पण असे करणे टाळले पाहिजे.
सफरचंद दुधासोबत खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्यांचा प्रभावही वाढू शकतो.
सफरचंद खाण्यापूर्वी ते चांगले धुवा.