सकाळ डिजिटल टीम
आपण जेवणातील अनेक पदार्थांमध्ये चिंच वापरतो. उदा. चिंचेची कढी, चटणी व इतर पदार्थ. पण, चिंचेचे आपल्या शरीराला होणारे फायदे तुम्हाला माहित आहे का ?
चिंचेतील फायबरचे प्रमाण आपली भूक नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे वजन वाढत नाही.
चिंचेतील अँटीऑक्सीड्ंट आणि व्हिटॅमिन C मुळे त्वचा निरोगी व चमकदार राहते.
आयुर्वेदात चिंचेचा तापावरील औषध म्हणून वापर होतो. कारण चिंचेतील थंडपणा शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.
चिंचेतील व्हिटॅमिन C आणि इतर पौष्टिक सत्वांमुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते.
चिंचेतील दाहक विरोधी क्षमता रोंगामधून किंवा दुखापतीतून सावरण्यास मदत करते.
कॅंन्सर व हृदयाच्या आजारांपासून वाचण्यासाठी चिंचेतील अँटीऑक्सिडंट्सची मदत होते.
चिंचेमुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो.
चिंचेतील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते.