हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी शरीर देते 'हे' संकेत, जाणून घ्या नाहीतर..

सकाळ डिजिटल टीम

कधी-कधी व्यक्तीचा मृत्यूही होतो

आजच्या वाईट जीवनशैलीमुळे हृदयविकाराचा झटका येणे सामान्य झाले आहे. हे इतके अचानक घडते की, दवाखान्यात पोहोचणेही अवघड होऊन बसते आणि कधी-कधी व्यक्तीचा मृत्यूही होतो.

Heart Attack Symptoms

शरीर आपल्याला सिग्नल देण्यास सुरुवात करते

अशा परिस्थितीत हृदयविकाराचा झटका अचानक येतो असे अनेकांना वाटते, पण तसे नाही. हृदयविकाराचा झटका येण्याच्या एक महिना आधी आपले शरीर आपल्याला सिग्नल देण्यास सुरुवात करते.

Heart Attack Symptoms

थकल्यासारखे वाटणे

जर तुम्हाला वारंवार थकवा जाणवत असेल, तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. नॅशनल हार्ट, ब्लड अँड लंग इन्स्टिट्यूटच्या मते, ही लक्षणे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त दिसतात.

Heart Attack Symptoms

भूक न लागणे

भूक न लागणे हे देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकते. यात काही खावेसे वाटत नाही. पूर्वीप्रमाणे बाहेरचे जेवण पाहून तोंडाला पाणी सुटायचे, पण आता भूक न लागल्याने तेही होत नाही.

Heart Attack Symptoms

शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना

जर तुम्हाला झोपताना तुमच्या खांद्यावर किंवा जबड्यात दुखत असेल, तर समजून घ्या की तुमच्या हृदयात काही समस्या आहेत. कारण, हृदयविकाराचा झटका थेट डाव्या खांद्यावर आणि जबड्याशी संबंधित आहे.

Heart Attack Symptoms

घाम येणे

हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात अशक्तपणा जाणवू लागतो. याशिवाय घामही येऊ लागतो. याचे कारण म्हणजे शरीरात रक्त नीट पोहोचत नाही. ही लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Heart Attack Symptoms

यकृत समस्या

हृदयात कोणतीही समस्या आली की, यकृतातही समस्या निर्माण होऊ लागतात. अन्नाचे पचन नीट होत नाही, त्यामुळे पोटात गॅस आणि जळजळ होते.

Heart Attack Symptoms

हृदयाच्या आरोग्यापासून ते हाडे मजबूत करण्यापर्यंत..; उकडलेल्या बटाट्याचे कोणते आहेत आरोग्यदायी फायदे?

Boiled Potatoes Benefits | esakal
येथे क्लिक करा