Sudesh
मांजरींना अशुभ मानणारे कित्येक लोक या जगात आहेत. मात्र, मांजरींना क्यूट समजणाऱ्या कॅट लव्हर्सची संख्याही काही कमी नाही.
तुम्हीदेखील कॅट लव्हर असाल, तर जपानमधील या खास जागा तुमच्यासाठी खरोखरच स्वर्गासमान असतील.
जपानमधील दोन बेटांवर चक्क माणसांपेक्षा जास्त मांजरी राहतात.
यातील एका बेटाचं नाव आओशिमा आहे. याठिकाणी 15-20 नागरिक राहतात, तर मांजरांची संख्या तब्बल 120 पेक्षा अधिक आहे.
जपानमधील ताशिरोजिमा बेटावर देखील 100 हून अधिक मांजरी आहेत. या मांजरी सगळीकडे अगदी आरामात फिरत असतात.
या दोन्ही बेटांवर उंदरांची संख्या वाढल्यामुळे, त्यावर नियंत्रणासाठी मांजरींना आणण्यात आलं होतं.
आता ही बेटे माणसांपेक्षा या मांजरींचंच घर झाली आहेत. या बेटांवर मांजरींचं मंदिर देखील उभारण्यात आलं आहे.
एवढ्या प्रमाणात मांजरी असल्यामुळे या बेटांवर पाळीव श्वानांना नेण्यास बंदी आहे.