सकाळ डिजिटल टीम
चिपळूण आणि खेड तालुक्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळला. सुमारे तासभर पडलेल्या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे.
वीजपुरवठा खंडित झाला असून, महामार्गावर पाणी साचल्याने वाहने चालविण्यात अडचणी येत होत्या. याची चित्रमय झलक...
खेड-दापोली मार्गावर वादळी पावसामुळे झाडे पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली.
चिपळूण : वादळी वाऱ्यामुळे शहरातील मुरादपूर मशिदीजवळ झाड कोसळले.
पावस : खेड, चिपळुणात वादळी पाऊस झाला असला तरी रत्नागिरी तालुक्यात मात्र पावसाने हुलकावणी दिली आहे. गुरुवारी सायंकाळी आकाश भरून आले असले तरी पाऊस झाला नाही.
सावर्डे परिसरात अनेक ठिकाणी महावितरणच्या तारा तुटल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला.
खेड तालुक्यातील भेलसई येथे पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेताना लहान मुले.
खेड : रॉयल आर्केडवरील उडालेले पत्रे.