शोलेमध्ये दगडावर नाचताना हेमामालिनींनी वापरलेली 'ही' युक्ती

सकाळ डिजिटल टीम

रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले हा सिनेमा खूप गाजला. अजूनही हा सिनेमा हिंदी मधील क्लासिक सिनेमांपैकी एक सिनेमा आहे.

या सिनेमातील हेमामालिनी यांच्यावर चित्रित झालेलं 'जब तक है जान' हे गाणं खूप गाजलं.

दगडावर नाचत हेमामालिनी यांनी केलेला नाच त्या काळी खूप गाजला होता.

पण तुम्हाला माहितीये का ? हेमामालिनी यांनी हा डान्स दगडावर केलाच नव्हता.

सिनेमाच्या टीमने कलाकार दगडावर उभे राहिले आहेत असं वाटावं म्हणून लाकडी प्लॅटफॉर्म्स दगडामागे उभे करण्यात आले होते. त्यावर कलाकार उभे राहायचे.

हेमामालिनी यांनी या सिनेमात केलेलं नृत्य या लाकडी प्लॅटफॉर्मवरच केलं असून त्यांना दगडाचं स्वरूप देण्यात आलं आहे.

अभिनेते सचिन पिळगावकर यांनी त्यांचं आत्मचरित्र 'हाच माझा मार्ग एकला' मध्ये याबाबत नमूद केलं आहे.

समांथाचं नाव नागा चैतन्यची पाठ सोडेना - येथे क्लिक करा