Anuradha Vipat
हेमंत ढोमे जगण्यात आणि कामातही पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटत असतो
आज हेमंतनं ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्तानं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हेमंतनं ‘जागतिक पर्यटन दिना’निमित्त त्याच्या सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर केली आहे
या पोस्टमध्ये हेमंतनं लिहिलं आहे की, भ्रमंती करताना प्रत्येक पावलावर नवं काही उमगतं असं म्हणतात; त्याचा पदोपदी अनुभव येतो.
या पोस्टमध्ये हेमंतनं लिहिलं आहे की,आमचं महाराष्ट्रातलं पर्यटन हे खाण्याच्या नकाशावर अवलंबून असतं.
पुढे पोस्टमध्ये हेमंतनं लिहिलं आहे की, भटकंती केल्यानं विविध गोष्टी आणि जागा कळतात, वेगवेगळी माणसं भेटतात.
पुढे पोस्टमध्ये हेमंतनं लिहिलं आहे की,प्रत्येक गावा-शहराची एक वेगळी ऊर्जा असते, त्याचा वास असतो.