Anuradha Vipat
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
या व्हिडिओत त्यांनी वाघाची शिकार करून त्याच वाघाचा दात गळ्यात घातल्याचा दावा केला होता
यावर चित्रपट निर्माता आणि अभिनेता हेमंत ढोमे याने ट्विटरद्वारे संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे.
हेमंत ढोमेने केलेल्या आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “या शिकारी बाबूच्या गळ्यातला दात कायद्याने घशात घालण्यात यावा ही वन खात्याला नम्र विनंती!
पुढे ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की, असे लोकप्रतिनीधी असतील तर कठीण आहे आपलं… तुम्हाला शौक करायला नाही तर आमची, महाराष्ट्राची, वन्य संपत्तीची, पर्यावरणाची सेवा करायला निवडून दिलंय!”
उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मुखपत्र असलेल्या 'सामना' च्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला.