Anuradha Vipat
काल हेमंतचा वाढदिवस होता. हेमंतने त्याचा ३८वा वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा केला
त्यानिमित्ताने हेमंतची पत्नी अभिनेत्री क्षिती जोगने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
या पोस्टमध्ये क्षिती जोगने हेमंतचे खरे आडनाव काय आहे हे सांगितले आहे.
क्षितीने हेमंतसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने हॅशटॅग Happypatil असे कॅप्शन दिले आहे. क्षितीने असे कॅप्शन का दिले आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
नुकताच हेमंतने एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्याने खरे आडनाव सांगितले होते
आमचे मूळ आडनाव हे ढोमे पाटील असे आहे. माझे नातेवाईक हेच आडनाव लावतात. पण माझे वडील हे पोलिसात असल्यामुळे त्यांनी कधीही पाटील आडनाव लावले नाही असं हेमंतने सांगितले