कार्तिक पुजारी
हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२४ जाहीर झाला आहे. या इंडेक्समध्ये फ्रान्सने पहिले स्थान मिळवलंय.
तर भारताचे स्थान मागील वर्षाच्या तुलनेत एक अंकाने घसरले आहे.
२०२३ मध्ये भारत या इंडेक्समध्ये ८४ व्या स्थानी होता, तर यावर्षी तो ८५ व्या स्थानी आला आहे.
हेनलेचा हा रिपोर्ट काहीसा आश्चर्यकारक आहे असं म्हणावं लागेल
कारण मागील वर्षापर्यंत भारतीय नागरिक ६० देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास करु शकत होते.
सध्या भारतीय नागरिक ६२ देशांमध्ये कोणत्याही व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात.
फ्रान्सशिवाय जर्मनी, इटली, जापान, सिंगापूर आणि स्पेन या देशांनी देखील अव्वल यादीमध्ये स्थान मिळवलं आहे.